दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी एअर प्युरीफाइंग टॉवर उभारा! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

252

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी एअर प्युरीफाइंग टॉवर उभारा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले. त्याचबरोबर सरकारच्या ऑड-ईव्हन या योजनेमुळे प्रदूषण कमी झाले आहे का, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केला.

दिल्ली प्रदूषणाने बेजार झाली असून येथील एअर क्लालिटी इंडेक्स 600 च्या जवळपास आहे. म्हणजेच हवा प्रचंड प्रमाणात प्रदूषित आहे. अशा वातावरणात श्वास कसा घेता येईल, असा सवाल करतानाच ऑड-ईव्हन योजना वायुप्रदूषणावर मार्ग होऊ शकत नाही. या योजनेमुळे प्रदूषण कमी झाले आहे का, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसांत दिल्लीतील प्रदूषण कमी होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. तसे न झाल्यास ऑड-ईव्हन योजनेचा कालावधी 18 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येईल असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

वायुप्रदूषणात वाहनांचा केवळ 3 टक्के वाटा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सांगितल्यानुसार वायुप्रदूषणात वाहनांचा केवळ 3 टक्के वाटा आहे. कार, बांधकामांदरम्यान होणारे प्रदूषण तसेच रस्त्यावरची धूळ, माती यामुळेही प्रदूषण होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ऑड-ईव्हनबाबत सरकार काय म्हणाले

ऑड-ईव्हन योजनेत दिलेल्या काही सवलती बंद केल्या तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे दिल्ली सरकारच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले. दुचाकींना काही सवलती देण्यात आल्या आहेत परंतु या सवलती बंद करणे गरजेचे असून याबाबतचा विचार सुरू असल्याचे सरकारने सांगितले.

दिल्ली प्रदूषणाने बेहाल

 

आपली प्रतिक्रिया द्या