गौतम गंभीरची इंदूरमध्ये मजामस्ती, प्रदूषणाबाबत आयोजित बैठकीला दांडी मारल्याने ‘आप’चा निशाणा

440

दिल्लीत प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीला निवडणूक लोकप्रतिनिधीच हजर राहिले. दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनीही बैठकीला दांडी मारली.

एकीकडे दिल्ली प्रदूषणाने बेहाल असताना गौतम गंभीरची मात्र इंदूरमध्ये मजामस्ती सुरू आहे, असे म्हणत गंभीरचा इंदौरमध्ये जिलेबी खातानाचा फोटो ‘आप’ने शेअर केला. गंभीर इंदूरमध्ये मजामस्तीत बिझी आहे. गंभीर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी गैरहजर राहिल्याने ही बैठकच रद्द करावी लागली.

बैठकीला हजर होते केवळ सदस्य

दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी संसदेच्या स्थायी समिती आणि नगर विकास विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित नव्हते. समितीत एकूण 30 सदस्य आहेत, मात्र केवळ पाच जण हजर होते. त्यामुळे काही मिनिटांतच ही बैठक गुंडाळण्यात आली.

गंभीर यांनी जबाबदारी झटकली

‘प्रदूषणावरून राजकारण करण्यासाठी गौतम गंभीर नेहमी तयार असतात, पण जेव्हा प्रत्यक्षात काम करण्याची वेळ आली तेव्हा गंभीर यांनी आपली जबाबदारी झटकली. ते नेहमीच जबाबदारीपासून पळ काढतात’ अशा शब्दांत गंभीर यांच्यावर आपने ट्विटरवरून निशाणा साधला आहे. बऱयाच आठवडय़ांपूर्वी ही बैठक निश्चित केली होती, परंतु गौतम गंभीर बैठकीला आले नाहीत. गौतम गंभीर यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्सपुरतेच गांभीर्य आहे काय? दिल्लीतील प्रदूषणात त्यांना काहीच गांभीर्य नाही का, असा सवालही त्यांना करण्यात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या