दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तासभर अंधारात, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सर्व काऊंटर ठप्प

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सोमवारी प्रचंड गोंधळ उडाला होता. टर्मिनल-3वरील सर्व काउंटरवरील चेक इन आदी प्रक्रिया बंद पडल्यामुळे प्रवाशांची दीर्घ काळ रखडपट्टी झाली.
विमानतळाचा वीजपुरवठा करणाऱ्या पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे उडालेल्या सावळागोंधळाबद्दल एका प्रवाशाने एक्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काउंटर ठप्प आहे… डिजी यात्रा नाही आणि काही नाही, कुठलीही यंत्रणा काम करत नाहीये, असे त्याने लिहिले होते.

n टर्मिनल-3वरून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही प्रकारची उड्डाणे हाताळली जातात. या वाहतूक व्यवस्थेवर वीज गायब झाल्याचा काहीही परिणाम झाला नाही, असा दावा विमानतळ अधिकाऱयांनी केला असला तरी एक्सवरील व्हीडीओ आणि पह्टोंमधून तिथली खरी परिस्थिती प्रवाशांनीच दाखवून दिली होती.

एसी, सामान चेक इन सर्व काही पडले बंद

सिद्धार्थ मलिक आणि इतरही काही प्रवाशांनी विमानतळावरील गोंधळाचा व्हीडीओ, फोटो एक्सवर शेअर केले होते. वीजपुरवठा नसल्यामुळे सामान चेक इनक करणे, सामान विमानात लोड करणे, वातानुकुलन यंत्रणा सारेच बंद पडले होते. बॅगेज लोडिंग, डिजी यात्रा आणि एअर पंडिशनर अशा सर्व सुविधा पॉवर बॅकअपवर सुरू होण्यासही वेळ लागत होता. यामुळे प्रवाशी वैतागले होते. काही विमानांतही प्रवाशांना थांबवून ठेवण्यात आले होते.