देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली!- प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी

416

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वढेरा यांनी शुक्रवारी सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था बरबाद झाली. हा एक तुघलकी निर्णय होता अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी ट्विटरद्वारे मांडली. नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाली. हा निर्णय म्हणजे राष्ट्रीय आपत्तीच होती. या तुघलकी निर्णयाला कोण जबाबदार आहे असा सवालही त्यांनी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नोटाबंदीवरून सरकारला लक्ष्य केले. त्यांनीही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर काही मिनिटांतच अर्थव्यवस्थेच्या अधोगतीला सुरुवात झाली. लाखो लोकांचे आयुष्यच बरबाद झाले. अर्थतज्ञांनीही हा निर्णय चुकीचा होता असे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे आकडेच सांगत आहेत की सरकारने नोटाबंदीचा घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा होता, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या