मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाकिस्तानला लावणार 3000 कोटींचा चुना

30763

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात जनक्षोम उसळला आहे. देशातील प्रत्येक नागरिक पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी करत आहे. यापार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात सर्वात आधी पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नॅशनचा दर्जा काढून घेण्यात आला त्यानंतर आता केंद्र सरकारने शत्रू संपत्ती अधिनियमातंर्गत शत्रूंचे 3000 कोटी रुपयांचे शेअर विकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे शेअर अशा व्यक्तींचे आहेत जे फाळणी झाल्यानंतर हिंदुस्थान सोडून निघून गेले आहेत. ज्यातील बहुतेक जण पाकिस्तानात स्थायिक झाले असून हिंदुस्थानमध्ये त्यांची बरीच संपत्ती धूळखात पडून आहे. हीच संपत्ती विकून हिंदुस्थान पैसे कमावणार आहे. अनेक वर्षांपासून पडून असलेली ही संपत्ती विकण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे. ही समिती शत्रू संपत्तीची किंमत व त्याच्या शेअरची किंमत ठरवण्याची कामे करणार आहे. या समितीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. याचा अर्थ यापुढे हिंदुस्थान सरकार पाकिस्तानला कुठल्याही व्यवसायात सवलत देणार नाही. तसेच इस्लामाबादमधून येणाऱ्या सर्वच वस्तूंवर 200 टक्के आयात कर लावण्यात आला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील 2017-18 साली झालेल्या द्विपक्षीय व्यापारात 2.41 अरब डॉलरचा व्यवहार झाला होता. याचदरम्यान हिंदुस्थानने 48.85 कोटी डॉलर सामान पाकिस्तानातून आयात केले तर 1.92 अरब डॉलरचे सामान निर्यात केले होते. पण आता पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशातील राजकीय आणि आर्थिक संबंध बिघडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या