‘दिल्लीचे कोचिंग सेंटर बनले डेथ चेंबर्स’, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली

दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राऊ कोचिंग सेंटरच्या तळघरात IAS साठी तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एमसीडीला बजावली नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) नोटीसही बजावली आहे. त्याचवेळी, सुनावणीदरम्यान न्यायालयाने ताशेरे ओढत म्हटाले की, कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर बनले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कोचिंग सेंटरमधील सुरक्षेच्या निकषांशी संबंधित मुद्द्याची स्वतःहून दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने कोचिंग इन्स्टिट्यूटमधील अलीकडच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली ज्यामध्ये तरुण उमेदवारांना जीव गमवावा लागला.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली सरकार आणि एमसीडीला आतापर्यंत कोणते सुरक्षेचे नियम ठरवले आहेत, अशी विचारणा केली.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ही घटना डोळे उघडणारी आहे की कोणत्याही संस्थेने सुरक्षिततेचे नियम पाळल्याशिवाय त्यांना चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये.

कोचिंग सेंटर्स देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या उमेदवारांच्या जीवाशी खेळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दिल्ली कोचिंग सेंटरमधील मृत्यूची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली.