डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

20
viral-acharya-rbi

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेला केवळ सातच महिन्यांत आणखी एक धक्का बसला. केंद्रीय बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपला कार्यकाळ संपायला सहा महिने शिल्लक राहिलेले असतानाच सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ‘गरीब लोकांचे रघुराम राजन’ म्हटले जाणारे विरल आचार्य हे बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी डिपार्टमेंटचे प्रमुख होते. यापुर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनीही गेल्या डिसेंबरमध्ये खासगी कारण देत आपले पद सोडले होते.

विरल आचार्य रिझर्व्ह बँकेच्या अशा बडय़ा अधिकाऱयांमध्ये सामील होते ज्यांना ऊर्जित पटेल यांच्या टीमचा प्रमुख हिस्सा मानले जात होते. ते आता न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ‘सॅटर्न स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये प्राध्यापक म्हणून जॉइन होणार आहेत. 23 जानेवारी 2017 रोजी रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून जॉइन झालेले विरल आचार्य आपल्या पदावर जवळपास 30 महिने कार्यरत होते. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो आणि एम. के. जैन हे तीन डेप्युटी गव्हर्नर गमावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या