Tis hazari court violence चूक दोघांची, टाळी एका हाताने वाजत नाही!- सर्वोच्च न्यायालय

1026
supreme-court-of-india

तीस हजारी कोर्टात वकील आणि पोलीस यांच्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना समज दिली. ‘चूक दोघांचीही झाली असेल. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. या प्रकरणी आम्ही गप्प बसणेच चांगले आहे,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयात ओदिशात सुरू असलेल्या वकिलांच्या संपाच्या खटल्याबाबत सुरू असलेल्या सुनावणीवेळी बार काऊंन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी दिल्लीतील तीस हजारी कोर्टात झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. त्यावेळी न्यायामूर्ती संजय किशन कौल आणि के.एम. जोसफ यांच्या खंडपीठाने टाळी एका हाताने वाजत नसल्याचे सांगितले.

वकील आणि पोलिसांच्या सुरू असलेल्या संघर्षाबाबतचे मीडिया कव्हरेज बंद करावे, अशी याचिका शुक्रवारी केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली.

महिला आयपीएसला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
तीस हजारी न्यायालयात झालेल्या हिंसाचारावेळी एका महिला आयपीएस अधिकाऱयाला वकिलांचा गट मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वकिलांपासून तिला वाचवणाऱया मदतनीसालाही मारहाण करण्यात आली. दिल्ली पोलीस आता काय भूमिका घेतील, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या