सिद्धू मरियम नवाजला भेटून आले असते तर खरे पंजाबी ठरले असते!

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनी पंजाबचे कॉँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना भेटण्याऐवजी सिद्धू जर नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाजला तुरुंगात जाऊन भेटले असते, तर खरे पंजाबी म्हणून ओळखले गेले असते. असे फतेह यांनी आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्याचबरोबर सिद्धू यांचे इमरान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानला जाणेच चुकीचे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

मरियम ही शूर महिला आहे. तिच्याआधी पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो या शूर महिला होत्या. ज्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानमध्ये असा कायदा आहे. ज्याअंतर्गत कोणीही हत्येच्या आरोपातून मुक्त होऊ शकतो. त्यासाठी फक्त पैसा मोजावा लागतो, असेही फतेह यांनी यावेळी म्हटले . त्याचबरोबर इमरान खान पंतप्रधान झाल्याने पाकिस्तान अजिबात बदलणार नाही. कारण सर्व सूत्रे लष्कराच्या हातात आहे. यामुळे इमरान काहीच करू शकत नाहीत. असा दावाही फतेह यांनी केला आहे.

इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्यास सिद्धू पाकिस्तानला गेले होते. तेथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली होती. यावरून देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पण आपण तिथे शांतीदूत म्हणून गेल्याचे सिद्धू यांनी म्हटले होते. याचदरम्यान इमरान यांच्या शपथविधी सोहळ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात इतर पाहुण्यांशी हस्तांदोलन करणाऱ्या इमरान यांनी सिद्धू यांच्याकडे ढुंकूनही पाहीले नाही, असे या व्हिडीओत दिसत होते.

summary-delhi-siddhu-should-meet-marim-nawaz-rather-than-bajwa

आपली प्रतिक्रिया द्या