ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पटीने अधिक वेगाने धावत आहे ही अज्ञात वस्तू, वैज्ञानिकही हैराण

2160

अंतराळात वेगाने धावणाऱ्या एका अज्ञात वस्तूने जगभरातील वैज्ञानिकांची झोप उडवली आहे. या वस्तूचा वेग 59.54 लाख किलोमीटर प्रतितास म्हणजे सेंकदाला 1654 किलोमीटर एवढा आहे. आतपर्यंत कोणीही अंतराळात एवढ्या वेगाने धावणारी वस्तू बघितलेली नसल्याचे सांगितले आहे. यामुळे वैज्ञानिकही हैराण झाले आहेत.

पृथ्वीपासून आहे 29 हजार प्रकाशवर्ष दूर

ही अज्ञात वस्तू आपल्या आकाशगंगेत असलेल्या ब्लॅक होलमधून बाहेर आली असून ती भयानक वेगाने धावत आहे. पृथ्वीपासून ती जवळजवळ 29 हजार प्रकाश वर्ष दूर अंतरावर आहे. याचा वेग अंतराळात उडणाऱ्या अन्य वस्तूंच्या तुलनेत दहा पटीने अधिक आहे.

कार्नेगो युनिव्ह्रसिटीचे सर्गेई कोपोसोव यांनी या वस्तूचा शोध लावला आहे. ग्रूस नक्षत्रात या वस्तूचा शोध घेण्यात आला असून या नक्षत्राला क्रेन नक्षत्र असेही म्हणतात. पृथ्वीपासून जवळच ही वस्तू सापडल्याने वैज्ञानिकही चक्रावले आहेत. ज्या ब्लॅक होलमधून ही वस्तू निघाली आहे त्याचा आखार सूर्याच्या आकारमानापेक्षा 40 लाख टक्के जादा आहे.

दरम्यान, अंतराळात ध्वनीपेक्षा पाच पटीने अधिक वेगाने धावणाऱी ही वस्तू एक युवा तारा असून त्याला S5-HVS1 नाव देण्यात आले आहे. या ताऱ्याचे वयोमान फार नसून याचे तापमान 7204 डिग्री सेल्सियस ते 9982 डिग्री सेल्सियस दरम्यान आहे. तर सूर्याचे तापमान 5504 डिग्री सेल्सियस एवढे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या