शबरीमला प्रकरण, सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवले प्रकरण

474
supreme-court-of-india

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्ववयोगटातील महिलांचा प्रवेश पुन्हा एकदा लटकला आहे. शबरीमलात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या फेरविचार याचिकेवर गुरुवारी न्यायालय निर्णय देणार होते. मात्र 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की परंपरा ही धर्माच्या सर्वमान्य नियमांप्रमाणेच झाली पाहिजे. यामुळे याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 न्यायमूर्तींचे खंडपीठ करेल. सध्या तरी मंदिरात महिलांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच प्रवेश देणे सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबरला देण्यात आलेला निकाल कायम ठेवत शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश कायम ठेवत त्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र यावेळी न्यायालयात या मुद्यावरून न्यायमूर्तींमध्ये दोन गट पडल्याचे दिसले.  पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठातील दोन न्यायमूर्तीं पुनर्विचार याचिका फेटाळण्याच्या विचारात होते. तर इतरांनी मात्र हा मुद्दा सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्याचे समर्थन केले. यामुळे बहुमताच्या आधारावर याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 न्यायमूर्तींचे खंडपीठच करेल हा निर्णय घेण्यात आला.

28 सप्टेंबर 2018 साली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर 56 पुनविर्चार याचिकांच्या आधारावर एकून 65 य़ाचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर 6 फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी यावर अंतिम निर्णय नंतर दिला जाईल असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या