सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून लढणार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. धडाकेबाज सिनेअभिनेते सनी देओल यांनी भाजपच्या कमळाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंदिगड येथील किरण खेर आणि पंजाबमधील होसिरपूर येथून सोमप्रकाश यांना मंगळवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर केली.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेते विनोद खन्ना भाजपचे खासदार होते. पंजाबमध्ये 13 जागा आहेत. त्यापैकी 3 जागा म्हणजेच अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूर भाजप लढवणार आहे.