पुन्हा कारगील झाल्यास निर्णायक युद्धच! हवाई दलप्रमुख

35

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानचे हवाई दल देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहे. आता पुन्हा कारगील झाल्यास निर्णायक युद्ध होईल. पाकिस्तानने आता कोणतीही कुरापत केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस धनोआ यांनी पाकिस्तानला मंगळवारी दिला.

कारगील युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना बी. एस. धनोआ यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले. पाच महिने पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र हिंदुस्थानी विमानांसाठी बंद ठेवले होते. पाकिस्तानने मंगळवारी ही बंदी उठवल्यानंतर काही तासांतच धनोआ यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. हवाई दल कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करायला सक्षम असून आकाशात ढग असतानाही अचूक मारा करण्याची क्षमता हवाई दलाकडे आहे. याचा प्रत्यय 26 फेब्रुकारीला हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवेळी आला आहे, असेही त्यांनी सांगितले. या एअर स्ट्राइकद्वारे हवाई दलाने आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे धनोआ यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या