रेल्वेचा भोंगळ कारभार; 30 तासांच्या प्रवासाला लावले 4 दिवस, मजूर हैराण

1682

लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष श्रमिक ट्रेन चालवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मजुरांना दिलासा मिळेल असे वाटत होते, मात्र त्यातही रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवासी मजुरांना मिळत आहे. 30 तासांच्या प्रवासाला सध्या 4 दिवस लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रवासात तहान, भूक आणि गरमीने मजूर हैराण झाले आहेत.

दिल्लीहून बिहारच्या मोतिहारी येथे जाणारी ट्रेन चार दिवसांनी समस्तीपूर येथे पोहोचली. 30 तासांच्या प्रवासासाठी 4 दिवस लागल्याने मजूर संतापले आहेत. मजुरांचे म्हणणे आहे की त्यांना तिकीट तर मोतिहारीचे दिले, मात्र ट्रेन इकडे तिकडे फिरवली जात आहे. आधीच आम्ही अडचणीत आहोत, हाल सुरू आहेत, आणि अशात आता प्रवासही तापदायक झाला आहे, अशा प्रतिक्रिया प्रवासी मजुरांनी दिल्या आहेत. आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या