पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, बंदुकीची गोळी डोक्यातून आरपार जाऊन गरोदर पत्नीच्या मानेत घुसली

1581

बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात पतीने स्वत:च्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडली. ती गोळी त्याच्या डोक्यातून आरपार जाऊन सात महिन्यांची गरोदर असलेल्या पतीच्या मानेत घुसली. ही धक्कादायक घटना दिल्लीतचील गुरुग्राम परिसरात घडली आहे. सदर पतीची प्रकृती गंभीर असून पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

फिरदाबादहून पाच महिन्यापूर्वी रिंकू आणि राजवीर (नावं बदलली आहेत) हे गुरुग्रामला राहायला आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून राजवीर बेरोजगार असून त्यावरून रिंकूचे व त्याचे सतत वाद व्हायचे. रिंकू सात महिन्यांची गरोदर असल्याने शनिवारी राजवीर तिला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जात होता. रुग्णालयात जात असतानाच त्यांचे भांडण सुरू झाले. राजवीरने रिंकूला काही दिवसांसाठी माहेरी जा असे सांगितले मात्र रिंकू तयार नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात राजवीरने स्वत:कडील बंदुकीने डोक्यात गोळी झाडली. ती गोळी त्याच्या डोक्याच्या आरपार जाऊन रिंकूच्या मानेला लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी बंदुकीचा आवाज ऐकून गाडीकडे धाव घेतली तर रिकू राजवीर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर तिथून सफदरगंजला हलविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या