‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण करून विरोधक दंगली घडवतात!

450

दिल्लीतील हिंसाचारावरून चौफेर टीकेचे लक्ष्य बनलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी विरोधकांवर हिंसाचाराचे खापर फोडले. ‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण करून विरोधकच दंगली घडवताहेत असा पलटवार त्यांनी केला. देशातील एकाही मुस्लिम, अल्पसंख्याकाचा नागरिकत्वाचा अधिकार काढून घेणार नाही हे मी पुन्हा एकदा निक्षून सांगतो असे ते म्हणाले.

गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी ओडिशात गेले होते. या वेळी त्यांनी भुवनेश्वरमध्ये सीएएच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी दिल्लीतील हिंसाचाराचे खापर विरोधकांवर फोडले. विरोधक सीएएबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. लोकांना भडकावताहेत, दंगली घडवून आणताहेत. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे असा आरोप त्यांनी केला. सीएए हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व घेणारा नाही. शेजारच्या देशांतील अल्पसंख्याक समाजातील लोकांचे तेथे शोषण केले जाते, त्यांना छळले जाते. त्या छळणुकीला कंटाळून स्वधर्म वाचवण्यासाठी हिंदुस्थानात येणाऱया लोकांना सीएएच्या माध्यमातून नागरिकत्व दिले जाईल, असे गृहमंत्री शहा यांनी या वेळी स्पष्ट के

आपली प्रतिक्रिया द्या