दिल्लीतील हिंसाचार सरकार पुरस्कृत, खासदार ओवैसींची टीका

344

दिल्लीत झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृत आहे अशी टीका खासदर असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच भाजपचा माजी आमदार पोलिसांना अल्टिमेटम देत आहे तर याचा अर्थ वरून परवानगी मिळाली आहे असेही ओवैसी म्हणाले.

ओवैसी म्हणाले की, “ट्रम्प यांच्या दौर्‍यावेळी दिल्लीत हिंसा होऊ शकते अशी माहिती सरकारला होती. तरी त्यांनी कारवाई का नाही केली. ही धार्मिक हिंसा नसून सरकार पुरस्कृत हिंसा आहे.  दिल्ली पोलीस विनाकारण हिंदुस्थानींचा अपमान करत आहेत. आता कारवाईची वेळ आहे असेही, ओवैसी म्हणाले.

एक व्हिडीओ ट्विट करून ओवैसी म्हणाले की तुमचे पोलीस हिंदुस्थानीचा सन्मान कमी करत आहेत. विनाकारण त्यांचा अपमान केला दाखवला जात आहे. आताच कारवाई केली जावी. या पोलिसांनवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या