हा फोटो दिल्ली हिंसाचारामधला आहे ? खरी माहिती समोर आली

6686

दिल्लीत उसळलेल्या दंगलीनंतर काही व्हिडीओ आणि फोटो हे प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये एक फोटो आहे तो म्हणजे एका लहान मुलावर पोलिसाने काठी उगारतानाचा. फेसबुकवर काही जणांनी हा फोटो शेअर करत म्हटलंय की ‘खूप मोठ्या दहशतवाद्याला मारताना दिल्ली पोलीस’ हा फोटो दिल्लीतील कुठल्या भागातील आहे हे अनेकांना कळत नव्हतं. अखेर या फोटोमागची खरी कहाणी समोर आली आहे.

हा फोटो खोडसाळ आणि दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या फोटोमध्ये दिसणारा मुलगा हा 10 वर्षांचा असून हा फोटो दिल्लीतलाच नाही तर हिंदुस्थानातही कुठे काढण्यात आलेला नाहीये. हा फोटो बांग्लादेशचा असल्याचं कळालं आहे. ढाकामध्ये हा फोटो काढल्याचं कळालं आहे. फेसबुकवर रफीक रजा, अनिल कुमार यादव यासारख्यांनी हा फोटो दिल्लीतला असल्याचं म्हणत फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यांनी फोटोमागची खरी कहाणी लक्षात न घेता शेअर केले होते. त्यांच्याप्रमाणे काहींना हा फोटो ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवरही शेअर केला होता.

या फोटोमागची खरी कहाणी शोधत असताना कळाले की हा फोटो द गार्डियन या वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराने 2010 साली टीपले होते. ढाक्यामध्ये कपडेनिर्मितीच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांची पोलिसांसोबत झडप झाली होती. झडपेदरम्यान गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीहल्ल्यात हा लहान मुलगाही सापडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या