‘टाईट जीन्स’मुळे कार चालवताना तरुणाला आला हृदय विकाराचा झटका

1036

टाईट जीन्स घातल्याने बांधा सुंदर दिसत असला तरी ही तात्पुरती सुंदरता तुमचा जीव घेऊ शकते. हे अधोरेखित करणारी घटना दिल्लीत घडली आहे. ‘टाईट जीन्स’घालून कार चालवताना एका तरुणाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौरभ शर्मा असे या तरुणाचे नाव आहे.

दिल्लीतील पीतमपुरा येथे राहणारा सौरभ 10 ऑक्टोबरला कार घेऊन ऋषिकेशला गेला होता. कार ऑटोमॅटीक होती. त्यामुळे तो निवांत होता. त्यात त्याने टाईट जीन्स घातल्याने त्याला पाय दुमडूनही बसता येत नव्हते. टाईट जीन्समुळे अनेक तास पायांची हालचालच न झाल्याने त्याच्या पायांना रक्तपुरवठा नीट होत नव्हता. यामुळे काही वेळातच त्याच्या पायात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. उजवा पाय ठणकू लागला. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर 12 ऑक्टोबरला तो दिल्लीत परतला. पण त्यानंतर तो घरात बेशुद्ध पडला. यामुळे त्याला ताबडतोब मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे स्पष्ट झाले. हृद्याशी संबंधित कुठलीही तक्रार नसताना त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंब चिंतेत होते. त्यावर डॉक्टरांनी ‘पल्मोनरी इम्बोलिज्म’मुळे त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगितले. ज्यावेळी त्याला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याचा श्वासही मंदावला होता. तब्बल 50 मिनिटं त्याला सीपीआर दिल्यानंतर त्याचा रक्तदाब सामान्य झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.

टाईट जीन्समुळे रक्तपुरवठा होण्यास अडथळे येतात. त्यात जर तुम्ही अनेक तासांपासून एकाच पोझिशनमध्ये बसले असाल तर शरीराच्या त्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. सौरभबरोबरही तेच झाले, असे डॉक्टरांनी सांगितले प्रवासात सैल कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या