मलेशियातील हिंदूंना झाकिर नाईकचा धोका, स्थानिकांमध्ये द्वेष पसरण्याचे प्रकार

494

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

चिथावणीखोर वक्तव्य करून मुस्लीम तरुणांची माथी भडकावणारा वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकिर नाईक याने मलेशियात हिंदूविरोधात बरळण्यास सुरुवात केली आहे. मलेशियात राहणाऱ्या हिंदूंना मलेशियन पंतप्रधान महातिर मोहम्मद नाही तर मोदीच अधिक प्रिय असून ते त्यांच्याच प्रति एकनिष्ठ आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य झाकिरने केले आहे. अशा वक्तव्यांतून स्थानिकांमध्ये हे हिंदूंविरोधी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मलेशियाचे मनुष्यबळ विकासमंत्री एम कुलसेगरन यांनी ही माहिती दिली असून मलेशियात हिंदूविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा उद्योग झाकिरने सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच झाकिर मलेशियात हिंदुस्थानी नागरिकांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचा मुद्दा केंद्रीय मंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे कुलसेगरन यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर झाकिर नाईकला मलेशियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तो बाहेरचा माणूस असून पळपुटा आहे. मलेशियाच्या इतिहासाबद्दल त्याला काहीही माहित नाही. यामुळे येथील स्थानिकांविरोधात वक्तव्य करण्याचा त्याला अधिकार नाही, असेही कुलसेगरन यांनी म्हटले आहे.

मलेशियातील हिंदूंच्या एकनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभारणाऱ्या झाकिरवर कारवाई करण्यात यावी, असेही कुलसेगरन यांनी म्हटले आहे. सध्या मलेशियात असेलल्या झाकिरला हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे असे हिंदुस्थानने मलेशिया सरकारला सांगितले होते. मात्र पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी झाकिरचे समर्थन करत त्याचे प्रत्यार्पण केले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या