डिलीव्हरी बॉयकडून अभिनेत्रीचा नंबर ‘अडल्ट’ ग्रुपवर व्हायरल, पोलिसात तक्रार

877
प्रातिनिधिक फोटो

आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जेवण मागवत असतो. त्यात पिझ्झा या पदार्थाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. ऑनलाईन ऑर्डर देताना डिलीव्हरी बॉयला फोन केल्यामुळे आपला नंबर व्हायरल होऊ शकतो. अशाच एका व्हायरल झालेल्या फोन नंबरमुळे अभिनेत्रीला मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.

gayatri-sai

या अभिनेत्रीचं नाव गायत्री सई असं आहे. ही तमीळ अभिनेत्री असून मणिरत्नमच्या अंजली या चित्रपटातून प्रसिद्ध झाली होती. तिने काही दिवसांपूर्वी एका पिझ्झा रेस्टॉरंट चेनच्या शाखेतून पिझ्झा मागवला होता. त्यावेळी तिचा फोन नंबर तो पिझ्झा डिलीव्हर करणाऱ्या बॉयकडे गेला. त्याने तिचा नंबर एका अडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला. त्यामुळे तिला दिवसरात्र अश्लील फोन आणि मेसेज येऊ लागले.

gayatri-sai-1

या प्रकाराला वैतागलेल्या गायत्रीने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये डिलीव्हरी बॉयचा फोटोही तिने शेअर केला. मला असंख्य फोन आणि मेसेज येत आहेत. ‘मी या माणसाची तक्रार अद्याप केलेली नाही कारण सदर कंपनीने आधी माझ्याशी बोलण्याची विनंती केली आहे. तुमच्यासोबत असं काही होऊ नये यासाठी तुम्ही सतर्क राहा’, असा संदेश तिने या पोस्टमध्ये दिला आहे. तिच्या या पोस्टची दखल घेऊन चेन्नई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

डिलीव्हरी बॉय आणि त्यांचे हे प्रताप काही नवीन नाहीत. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं घडली आहेत. 2017मध्येही एका डिलीव्हरी बॉयने पिझ्झावर थुंकण्याचा प्रताप केला होता. तुर्कस्तानच्या एस्किशर नावाच्या शहरात ही घटना घडली होती. इथे राहणाऱ्या एका व्यक्तिने ऑनलाईन पिझ्झा मागवला होता. बुराक नावाचा डिलीव्हरी बॉय त्याची डिलीव्हरी करायला आला होता. पिझ्झाचं पार्सल डिलीव्हर करण्याआधी त्याने ते उघडलं आणि त्यात थुंकला. स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्डिंगही केलं. ही घटना उघड झाल्यानंतर बुराकला अटक झाली होती. या कृत्यासाठी बुराकला 18 वर्षांच्या कैदेची शिक्षाही झाली.

आपली प्रतिक्रिया द्या