कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लातूरमध्ये 14 दिवसांचा लॉकडाऊनची मागणी

585

लातूर येथील महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. महापालिकेत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरिता कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समिती सभापती दिपक मठपती, नगरसेवक राजासाब मणियार, मनपा आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते. तसेच शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता कोरोना फैलावाची साखळी तोडण्यासाठी शनिवारपासून 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. सर्व मनपा पदाधिकारी, सभागृह नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष यांनीही याबाबत सहमती दर्शवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या