आडसकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पिकविम्याची मागणी

बीड जिल्ह्यातील माजलगाव, धारूर, वडवणी आणि केज या तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१८ च्या सोयाबीन पिकाचा विमा तसेच काही राहिलेल्या शेतकऱ्यांनाही सोयाबीन या पिकाचा विमा मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी बीड जिल्ह्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते व आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर व आमदार आर. टी. देशमुख यांनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच याबाबत आवश्यक ती कार्यवाही करु, असे सांगितल्याचे देशमुख यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आडसकरांनी लक्ष घातले आहे. पाणी फांऊंडेशनच्या कामावरही आडसकरांनी श्रमदान केले आहे. पाणी फांऊंडेशनमध्ये भाग घेतलेल्या गावांना या कामासाठी आर्थिक मदतही त्यांनी केलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या