वारकऱ्यांच्या दिंडीवेळी मार्गावर वाहतुकीस परवानगी देऊ नये – ह.भ.प. दत्ता महाराज आंधळे

883

श्री क्षेत्र पंढरपूरहुन आळंदीला निघालेल्या श्री संतनामदेव महाराज दिंडीमध्ये जेसीबी घुसून झालेल्या अपघातात दोन वारकरी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात घडली. ही घटना अंत्यत दुर्देवी असून याआधीही काही वर्षापूर्वी श्री संतगजानन महाराज दिंडीत अशी घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या घटनांची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. अशा घटना रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही, अशी खंत वारकरी तथा संत वाङ्मयाचे अभ्यासक ह.भ.प. दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे. सरकारने दिंडीकडे होणाऱ्या अपघातांकडे लक्ष न दिल्याने संत नामदेव महाराज यांचे वशंज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

सोपान महाराज नामदास यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.  देशाच्या घडणीतला वारकरी हा मुख्य घटक असून धर्म रक्षणासाठीही हा संप्रदाय नेहमी अग्रेसर असतो. या घटकाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब असल्याचेही आंधळे महाराज यांनी सांगितले. आपण असे किती रत्न गमावणार आहोत, सतत घडणाऱ्या दिंड्याच्या अपघातापासून बोध घेऊन प्रशासनाने दिंडी मार्गावरून होत असलेली इतर वाहतून बंद करावी किंवा त्या रस्त्यावरील वाहने इतर मार्गाने वळवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रत्येक दिंडीसाठी चोख पोलीस बंदोबस्त व सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या