नोटाबंदीचा सोन्याच्या आयातीला मोठा फटका, रिझर्व्ह बँकेनेच दिली माहिती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका सोन्याच्या आयातीला बसल्याचे आता समोर आले आहे. ५००, १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात घेतला. या महिन्यात देशात सोन्याची आयात तब्बल ११९.२ टन एवढी झाली. मात्र डिसेंबरमध्ये ही आयात ५४.१ टन, तर जानेवारीत हीच आयात ५३.२ टनावर आली अशी माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या चिकित्सा पत्रिकेत दिली आहे.

हजार, पाचशे या मोठय़ा मूल्याच्या नोटा अचानक व्यवहारातून काढून टाकल्यामुळे रोकड टंचाई उद्भवली. परिणामी सोन्यासह अनेक वस्तूची मागणी घटली, याकडे रिझर्व्ह बँकेने लक्ष वेधले आहे. नोटाबंदीनंतर घराघरातून होणाऱया सोन्याच्या मागणीत अचानक मोठी घट झाली, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या चिकित्सापत्रिकेत म्हटले आहे. या काळात ज्वेलर्सना अधिक प्रीमियम देऊन खरेदीदार आपल्याकडील जुन्या नोटा काढून टाकण्यासाठी इच्छुक होते.

आपली प्रतिक्रिया द्या