नोटाबंदी, जीएसटीमुळे हिंदुस्थान पिछाडीवर- डॉ. रघुराम राजन

21

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

देशाचा आर्थिक विकास नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) रोखला अशी परखड टीका मोदी सरकारवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली. तसेच सध्याचा आर्थिक विकास दर हा सात टक्के आहे तो देशाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा नाही, असेही राजन यांनी सरकारच्या निदर्शनास आणले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘हिंदुस्थानचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान देताना राजन पुढे म्हणाले, नोटाबंदी, जीएसटीच्या वादाचे तडाखे बसण्यापूर्वी 2012 ते 2016 या चार वर्षांमध्ये हिंदुस्थानच्या आर्थिक विकास दरात गतीने वाढ होत होती. नोटाबंदी, जीएसटी या लागोपाठ बसलेल्या दोन धक्क्यांनी हिंदुस्थानच्या विकासवृद्धीवर गंभीर परिणाम झाला. विशेष म्हणजे या काळात जागतिक अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असताना हे घडले.

summary- demonetization and gst pull backwards indian economy says dr raghuram rajan

आपली प्रतिक्रिया द्या