वारीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये आढळला डेंग्यूचा रुग्ण

43

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी वारीच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली असताना पंढरपूर शहरातील परिचारक नगर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला. प्रथमेश कृष्णकुमार पेंडाल (१७) असे या रुग्णाचे नाव आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

येत्या ४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक येतील. पंढरपूर शहरात सर्वत्र रस्ते आणि इतर विकास कामे सुरू आहेत. शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवले आहेत. जे रस्ते अस्तित्वात आहेत ते खड्डेमय झाल्याने पडलेल्या पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले दिसते. वारकरी पंढरीत दाखल होण्यापूर्वी डास निर्मूलनासाठी प्रशासकीय यंत्रणेने विशेष उपाय योजना राबविण्याची गरज आहे. अन्यथा वारीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना या डेंग्यूच्या रोगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या