डेनिमची साडी

40
Bollywood actress Sonam Kapoor poses on the red carpet as she arrives for the screening of the film 'The Great Gatsby' and for the opening ceremony of the 66th Cannes Film Festival in Cannes May 15, 2013. The Cannes Film Festival runs from May 15 to May 26. REUTERS/Eric Gaillard (FRANCE - Tags: ENTERTAINMENT HEADSHOT)

सामना ऑनलाईन

सोनम कपूर खरे तर बॉलीवूडमध्ये अँक्टींगपेक्षा  तिची स्टाईल आणि फॅशन सेन्स यासाठीच जास्त प्रसिध्द आहे. सोनम कपूर करीत असलेली स्टाईल आणि ड्रेसिंग सेंसमुळे तिला फॅशन दिवा, फॅशन आयकॉन असेही म्हटले जाते. साँवरिया पासून बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करीत असलेल्या सोनम कपूरला अभिनय हा निर्सगदत्त मिळाला आहे. वडील अनिल कपूर यांच्याकडून अभिनयाचे बाळकडू मिळाले. सोनमला जवळपास दहा वर्षे चांगली अभिनेत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्यासाठी वाट पहावी लागली. नीरजा या सिनेमासाठी तिने केलेली मेहनत, उत्कृष्ट अभिनय यामुळे सोनमच्या अभिनय कौशल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण या दरम्यानच्या काळात सोनमने वेगवेगळया फिल्म फेस्टिव्हलमध्ये, वेगवेगळया फॅशन शोमध्ये केलेली स्टाईल यामुळे तिला स्टाईल आयकॉन म्हटले गेले आहे.

नुकतेच फॅशन आयकॉन असलेल्या सोनम कपूर हिने मसाबा गुप्ता आणि तिच्या टीमने तयार केलेली साडी घातली होती. आता अनेकांना प्रश्न पडेल की नुसती साडी घातली तर त्यात काय इतके पण ही साडी होती डेनिमची…सोनमने घातलेल्या या डेनिम साडीमुळे तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात सोनम एकदम मादक आणि आकर्षक दिसते आहेच शिवाय साडी आणि पँट असे हटके मिश्रण या डेनिममध्ये मसाबा गुप्ता यांनी तयार केले आहे. डेनिम साडीबरोबरचे ?क्सेसरीज आणि वेगळी हेअरस्टाईल यामुळे सोनम ख्रया अर्थाने फॅशनिस्टा ठरली आहे. सोनम कपूरकडे आज ‘फॅशन आयकॉन’ म्हणून पाहिले जाते. तिची फिगर, तिचा फिटनेस आणि स्वत:ला प्रेझेंट करण्याची तिची स्टाईल पाहून अनेकांना तिचा हेवा वाटतो. आज तर या वेगळया हटके डिझाईन कॅरी केल्याने सोनम पुन्हा एकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

मसाबा गुप्ता आणि डेनिम जीन्स साडी

मसाबा गुप्ता आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये कोणी ओळखत नाही असे बहुतेक कोणी नाही. ए लिस्ट फॅशन डिझायनरमध्ये आज मसाबा गुप्ता यांचे नाव घेतले जाते. लहानपणी मसाबा यांना टेनिस प्लेअर व्हायचे होते, तर कधी शाळेत असताना डान्सर व्हायचे होते, कॉलेजमध्ये असताना करीअर संगीतातच करावे असे वाटते होते पण शेवटी फॅशन डिझायनिंग मध्येच करीअर करणाया मसाबाने अत्यंत कमी कालावधील स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

२००९  मध्ये लॅक्मे फॅशन वीक मध्ये इंटरनॅशनल इन्सिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीकडून मोस्ट प्रॉमिसिंग डिझायनर हा पुरस्कार मिळाल्यावर जवळपास ८ ते ९ वर्षात फॅशन इंडस्ट्रीमध्ये केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे. आज अनेक ए स्टार अभिनेत्री मसाबा हिने डिझाईन केलेले ड्रेस घालतात यावरुन मसाबाच्या डिझाईन्स यांना मागणी आहे हे दिसून येते.

आपली प्रतिक्रिया द्या