डेन्मार्क, स्वित्झर्लंडचे युरो स्पर्धेचे तिकीट बुक

338

डेन्मार्क व स्वित्झर्लंड या दोन देशांनी सोमवारी मध्यरात्री पुढल्या वर्षी होणाऱया युरो फुटबॉल स्पर्धेचे तिकीट बुक केले. एकीकडे डेन्मार्कने रिपब्लिक ऑफ आयर्लंडला 1-1 अशा बरोबरीत रोखले, तर दुसरीकडे स्वित्झर्लंडने जिब्राल्टरचा 6-1 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि आगेकूच केली.

मार्टीन ब्रेथवेटने 73व्या मिनिटाला गोल करीत डेन्मार्कला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मॅट डोहर्टीने 85व्या मिनिटाला गोल करीत आयर्लंडसाठी 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र आयर्लंडला गोल करता आला नाही. त्यामुळे ड गटामधून उपविजेता ठरणाऱया डेन्मार्कला पुढे पाऊल टाकता आले.

इटली सुसाट

स्वित्झर्लंडने जिब्राल्टरचा 6-1 अशा फरकाने फडशा पाडला आणि ड गटामधून 17 गुणांसह पहिले स्थान पटकावले. याचसह युरो स्पर्धेतील प्रवेशही दिमाखात मिळवला. फुटबॉलमधील दिग्गज संघ इटलीनेही आपला विजयी झंझावात कायम ठेवला. त्यांनी अर्मेनियावर
9-1 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. याप्रसंगी सलग 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात इटलीला यश लाभले आहे.  

आपली प्रतिक्रिया द्या