वशिष्ठी फुगल्यामुळे चिपळुणात जगबुडी! पाटबंधारे विभागाचा महापुरावर अहवाल

चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे एकच हाहाकार उडाला. शेतापासून घरांपर्यत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या महापुराला मुसळधार झालेला पाऊस जबाबदार होता. तसेच वशिष्ठाr फुगल्यानेच चिपळुणात जगबुडीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाटबंधारे विभागाने यासंदर्भातील अहवालात नमूद केले आहे.

पाटबंधारे विभागाने चिपळूणच्या महापुराबाबतची कारणमिमांसा केली असून प्राथमिक अहवाल शासनाला पाठवला आहे. यामध्ये मुसळधार पाऊस तसेच मुख्य म्हणजे, जगबुडीचे पाणी वशिष्ठीला मिळाल्यानं फुगवटा निर्माण झाला. त्याचबरोबर कोळकेवाडी धरणातून 8 हजार 400 क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती उद्भवल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. महापुराची कारणमिमांसा करतानाच पाटबंधारे विभागाने त्यावर उपायदेखील सुचवले आहेत.

खेड आणि चिपळूण शहराचे क्षेत्र हे जलसंपदा विभागाने निषिद्ध पूर प्रवण क्षेत्र दर्शवणारी निळीपूर रेषा आणि नियंत्रित पूर प्रवण क्षेत्र दर्शवणारी लाल पूररेषा केलेल्या सर्वेक्षणानुसार निळी पूररेषाच्या क्षेत्रात येत आहे. किमान सर्व बांधकामांचे जोतापातळी अर्थात निळी पूररेषाच्या वर म्हणजेच एक मजला उंच करणे आवश्यक आहे. याबाबत पुनर्वसनाबाबत निश्चित धोरण आखणे आवश्यक आहे. कारण अतिवृष्टीच्या काळात दोन्ही शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असते. फक्त यावेळी पूरपातळीची उंची जास्त होती.

उपाययोजना   

  • कोकणातील अतिवृष्टी विचारात घेता नुकसान झालेल्या धरण आणि कालव्यांची दुरुस्ती करणे. त्याचबरोबर ज्या धरणांना गळती आहे, विमोचक नादुरुस्त आहेत इत्यादी धरण सुरक्षिततेची कामे तातडीनं हाती घेणे आवश्यक आहे.
  • पूरपरिस्थिती अद्ययावत माहिती अखंडपणे प्राप्त होत राहण्याकरिता Atomization होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वयंचलित रेन गेज स्टेशन, स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन, अद्ययावत रडार यंत्रणा व संपर्क साधण्यासाठी सॅटेलाईट यांची सुविधा आवश्यक आहे.
  • कृष्णा खोऱयामध्ये राबवण्यात येत असल्याप्रमाणे Real Time Data System ची यंत्रणा कोकणात प्रत्येक जिह्यासाठी जलसंपदा विभागाच्या जलविज्ञान विभागामार्फत उभारणे आवश्यक आहे.

जगबुडी नदी चिपळूण शहराजवळच्या बहिरवली गावाजवळ वशिष्ठाrला मिळते. त्यामुळे या पाण्यानं चिपळूण शहरातील म्हणजेच वशिष्ठाr नदीतील पाणी थोपवले.

कोल्हापूर, सांगलीत मगरींचे टेन्शन

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचे संकट काहीसे कमी होत असले तरी कोल्हापूर, सांगलीत परिसरात मगरींच्या मुक्त संचारामुळे लोकांचे टेन्शन वाढले आहेपाणी ओसरू लागताच घराकडे परतणाऱया लोकांना मगरींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांसह शेतकऱयांच्या जनावरांवर मगरींकडून हल्ले होण्याची भीती असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिक काहीसे धास्तावले आहेत.

  • रत्नागिरी जिह्यात 4 ते 5 दिवस दिवसाला साधारण 200 ते 250 मिलीमीटर जोरदार पाऊस झाला.
  • भरतीच्या पाण्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा समुद्रामध्ये निचरा होऊ शकला नाही.
आपली प्रतिक्रिया द्या