नीलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊठसूट बेताल वक्तव्य करणाऱया माजी खासदार नीलेश राणे यांना चांगलेच फटकारले. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना नीलेश राणे यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता अजित पवार संतपाले. ‘ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायचे का? पण एक सांगतो त्या नीलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी नीलेश राणे यांना सुनावले.

नीलेश राणे यांच्याकडून मागील काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत उलटसुलट वक्तव्य केली जात होती. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेमध्येही नीलेश राणे यांनी तोंड घातले.

‘इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत’ अशी टीका त्यांनी केली होती. याही पुढे जाऊन त्यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या वक्तव्यांबाबत अजित पवार यांना विचारले असता ते संतापले. ते काहीही बोलतात, त्यावर मी बोलायचे का, असा सवाल करीत त्यांनी नीलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी जोरदार टीपणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या