लाचखोर कृषी उपसंचालकाला न्यायालयीन कोठडी कागदपत्रांची तपासणी सुरू

शेतमाल निर्यातीसाठी फायटो प्रमाणपत्र देण्याकरिता एक लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव याला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी दिली. त्याच्याकडील कागदपत्रांच्या तपासणीचे काम सुरू आहे, अशी माहिती उपअधिक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

विविध कृषी कंपन्यांना शेतमाल निर्यातीसाठी आवश्यक असलेले फायटो प्रमाणपत्र देण्यासाठी नरेंद्र आघाव याने संबंधित एका कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 1 लाख 64 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेताना मंगळवारी अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने आघावला कार्यालयातच रंगेहाथ पकडले. न्यायालयाने बुधवारी त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या