लैंगिक छळ – पीडिता आत्महत्येची चिठ्ठी लिहून घरातून निघाली, पोलिसावरच आहेत आरोप

1617
police

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करणारी 17 वर्षीय पीडिता तरुणी आत्महत्येची चिठी लिहून सोमवारी मध्यरात्री घरातून निघून गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुबीयांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बर्थ डे पार्टीमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार जून महिन्यात तळोजा परिसरात घडला होता. मात्र मोरे हे मोठे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती.

पीडित मुलीचा 5 जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिच्या कुटुंबीयांनी घरामध्ये बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला आमंत्रण नसताना निशिकांत मोरे उपस्थित राहिले. त्यांनी सर्वांसमोर पीडित मुलीची लैंगिक छळवणूक केली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. मात्र मोरे बडे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर विविध सामाजिक स्तरांतून दबाव वाढू लागल्यानंतर तळोजा पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या