डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून हत्यारे जप्त

33

सामना ऑनलाईन । सिरसा

बलात्काराच्या गुह्यात शिक्षा झालेला गुरमित राम रहिम बाबाच्या सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून पोलिसांनी शेकडो हत्यारे जप्त केली आहेत. यात रायफल, रिव्हॉल्वर आणि गनचा समावेश असून हरयाणा आणि पंजाब येथील डेरा सच्चा सौदाच्या अन्य संस्थांमधूनही हत्यारे जप्त करण्याचा सिलसिला सुरूच आहे.

रोहतक येथील सुनरिया कारागृहात गुरमित राम रहिम शिक्षा भोगत आहे. या शिक्षेनंतर पोलिसांनी स्थानिक लोकांना त्यांच्याकडील लायसन्स असलेली हत्यारे पोलीस स्थानकात जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३३ हत्यारेच पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. ज्या लोकांनी हत्यारे जमा केलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा पोलिसांचा विचार आहे. सिरसा येथील मुख्यालयात मोठय़ा प्रमाणावर हत्यारे मिळाल्याने पोलीसही हैराण आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हत्यारांचा साठा मुख्यालयात का ठेवण्यात आला याचा पोलीस तपास करीत आहेत.

बाबा राम रहिमकडे आलिशान गाडय़ांचा खजिना

राम रहिमला अटक झाल्यानंतर त्याच्याकडील आलिशान गाडय़ांचा खजिना त्याच्या विश्वासातील व्यक्तींकडे सोपविण्यास सुरुवात झाली. यात मर्सिडीज, ऑडी याशिवाय राम रहिमने स्वतः डिझाईन केलेल्या गाडय़ा आणि बाईक यांचा समावेश असून या गाडय़ा राम रहिमचे नातेवाईक व अन्य विश्वासातील व्यक्तींकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या