३० तासानंतर दुरांतोचे डबे हटवल्याबद्दल रेल्वेने थोपटली स्वत:ची पाठ

17
मंगळवारी टीपलेले छायाचित्र

सामना ऑनलाईन,ठाणे
नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनासह ८ डबे आसनगाव-वासिंद या रेल्वे स्थानकांदरम्यान घसरले होते. मंगळवारी पहाटे ६:३५ च्या सुमारास ही घटना घडली होती. हे डबे मार्गावरून दूर करून रुळ दुरूस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. या कामासाठी तब्बल ३० तास लागले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.


ही एक्सप्रेस घसरल्याने कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सततच्या पावसामुळे रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने हा अपघात घडल्याचे कळते.

आपली प्रतिक्रिया द्या