२०१८मध्ये विराट सेनेची विदेशात कसोटी, कसं असणार वेळापत्रक वाचा सविस्तर

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाने २०१७मध्ये आपल्या शानदार कामगिरीने क्रीडा प्रेमींची मने जिंकली आहे. सरत्या वर्षाप्रमाणेच नवीन वर्षातही अशीच कामगिरी करण्याचा हिंदुस्थानी संघाचा मनसुबा आहे. २०१७मध्ये विराट सेनेने देशात चांगली कामगिरी केली होती मात्र नव्या वर्षात टीम इंडियाला विदेशात सर्वाधिक सामने खेळायचे आहेत, त्यामुळे या दौऱ्यात फलंदाज आणि गोलंदाजांची कसोटी असणार आहे. २०१८मध्ये हिंदुस्थानचा संघ कोणत्या संघाविरुद्ध कधी आणि कुठे मालिका खेळणार आहे हे पाहुया…

नवीन वर्षात हिंदुस्थानचा पहिला दौरा हा दक्षिण आफ्रिकेचा असणार आहे. या दौऱ्यात ३ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका –

पहिली कसोटी – ५ ते ९ जानेवारी (केप टाऊन)
दुसरी कसोटी – १३ जानेवारी ते १७ जानेवारी (सेंच्युरिअन)
तिसरी कसोटी – २४ जानेवारी ते २८ जानेवारी (जोहान्सबर्ग)

हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका –

पहिला सामना – १ जानेवारी (डरबन)
दुसरा सामना – ४ फेब्रुवारी (सेंच्युरिअन)
तिसरा सामना – ७ फेब्रुवारी (केप टाऊन)
चौथा सामना – १० फेब्रुवारी (जोहान्सबर्ग)
पाचवा सामना – १३ फेब्रुवारी (पोर्टा एलिजाबेथ)
सहावा सामना – १६ फेब्रुवारी (सेंच्युरिअन)

हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका –

पहिला टी-२० सामना – १८ फेब्रुवारी (जोहान्सबर्ग)
दुसरा टी-२० सामना – २१ फेब्रुवारी (सेंच्युरिअन)
तिसरा टी-२० सामना – २४ फेब्रुवारी (केप टाऊन)

दक्षिण आफ्रिकेचा दीर्घकाळ चालणारा दौरा संपल्यानंतर हिंदुस्थान निधास चषकासाठी मैदानात उतरेल. ८ मार्च ते २० मार्च दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यादरम्यात हिंदुस्थान, बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी लढत होणार असून एकूण सात सामने होतील.

निधास चषक संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंडियन प्रिमिअर लिगसाठी (आयपीएल) मैदानावर उतरेल. २०१८मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासून ते मे महिन्याच्या शेवटापर्यंत ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

आयपीएलनंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंडच्या दीर्घकाळ दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान आणि इंग्लंड संघामध्ये ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका –

पहिला टी-२० सामना – ३ जुलै (मँचेस्टर)
दुसरा टी-२० सामना – ६ जुलै (कार्डीफ)
तिसरा टी-२० सामना – ८ जुलै (ब्रिस्टॉल)

हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका –

पहिला सामना – १२ जुलै (नॉटिंगहॅम)
दुसरा सामना – १४ जुलै (लंडन, लॉर्ड्स)
तिसरा सामना – १७ जुलै (लीड्स)

हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका –

पहिली कसोटी – १ ते ५ ऑगस्ट (एजबस्टन)
दुसरा कसोटी – ९ ते १३ ऑगस्ट (लंडन, लॉर्ड्स)
तिसरा कसोटी – १८ ते २२ ऑगस्ट (नॉटिंगहॅम)
चौथा कसोटी – ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर (साऊद्म्टन)
पाचवा कसोटी – ७ ते ११ सप्टेंबर (लंडन, ओव्हल)

इंग्लंडमध्ये दीर्घकाळ क्रिकेट खेळल्यानंतर हिंदुस्थानचा संघ आशिया चषकासाठी हिंदुस्थानमध्ये परत येईल. १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानसह अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होईल अथवा नाही हे अद्याप निश्चित नाही.

आशिया चषकानंतर आयसीसीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येईल. या दौऱ्यात वेस्ट इंडिज आणि हिंदुस्थान संघामध्ये ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ टी सामने खेळण्यात येतील. या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही.

वेस्ट इंडिजसोबत देशात दोन हात केल्यानंतर हिंदुस्थानचा संघ विदेशात जाणार आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या