सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तेलगू अभिनेत्रींना ३ तासांचे पावणे दोन लाख मिळायचे

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेमध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या जोडप्याला गेल्या आठवड्यामध्ये शिकागोमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणी शिकागो न्यायालयामध्ये एकूण ४२ पानांची तक्रार दाखल करण्याली आहे. या प्रकरणामध्ये हिंदुस्थानी जोडप्यासह टॉलिवूडमधील पाच अभिनेत्रींचाही समावेश असून तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या सेक्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती आणि त्यांची पत्नी चंद्रा यांनी अमेरिकेतील तेलगू असोसिएशन ऑफ साऊथ कॅलिफोर्निया आणि नॉर्थ अमेरिका तेलगू सोसायटी यांसारख्या नामांकित संघटनेच्या नावाने एक बनावट लेटरहेट तयार केले होते. मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान व्हिसा मिळवण्यासाठी या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आल्याचे ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे. सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या या तेलगू अभिनेत्रींना तीन तासांचे २५०० डॉलर्स म्हणजे पावणे दोन लाखांपेक्षा जास्त रुपये मिळायचे.

पोलिसांनी किशन आणि चंद्राच्या घरी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे वेगवेगळया बॅगेमध्ये ७० कंडोम सापडले. त्यांनी घरात एक नोंदवही ठेवली होती. त्या वहीमध्ये अभिनेत्रींची सर्व माहिती तसेच बनवाट कागदपत्रंही पोलिसांना आढळली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या