होळीपूजनाची माहिती

– पौर्णिमेच्या सायंकाळी देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी होळी पेटवावी.
– शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम होळीत एरंड, माड पोफळी अथवा ऊस उभा करावा, नंतर त्याच्याभोवती गोवऱया आणि लाकडे रचावीत.
– व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर ‘होलिकायै नमः’ हा मंत्र म्हणून होळीला अग्नी द्यावा.
– होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११ लवंगा, ७ बत्तासे, ५ विडय़ाची पाने, नारळ, पुरणाची पोळी, वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी.
– त्यानंतर होळीभोवती प्रदक्षिणा मारुन त्यात नारळ, तूप वाहावे. नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते.
– होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी.
– नंतर जमलेल्यांना नारळ, अननस यासांरखी फळे वाटावीत.

आपली प्रतिक्रिया द्या