देऊळवाडी सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ प्रथम क्रमांकाने सन्मानित

उरण शहरातील देऊळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव या मंडळास पोलीस आयुक्त परिमंडळ-2 पनवेल विभागातून विघ्नहर्ता 2018 चा सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव विघ्नहर्ता 2018 पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नवी मुंबईतील वाशीतील सिडको ऑडीटोरीअममध्ये झाला. यावेळी विविध गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, समाज प्रबोधन, सांस्कृतिक संवर्धन आदी उपक्रमांचे आयोजन करून समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा नवी मुंबई पोलिस आयुक्तालय मार्फत बक्षिस, प्रशस्तीपत्र देउन सन्मान केला जातो. 2018 चा प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट गणोशोत्सव मंडळ पुरस्कार देऊळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या