माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स,निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुह्यांची माहिती लपवली

788
devendra-fadnavis

विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आले आहेत. स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी समन्स पाठवले आहेत.

नागपूर दक्षिण-मध्य मतदारसंघातून 2014 ची विधानसभा निवडणूक लढताना उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी त्यांच्यावरील दोन गुह्यांची माहिती दिली नव्हती. यासंदर्भात नागपूरमधील ककील सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल करून फडणवीस यांच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालविण्याची मागणी केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळून लावत फडणकीसांना दिलासा दिला होता. पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस यांच्या विरोधातील तक्रारींवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोक्हेंबर रोजी याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात केली होती. 4 नोव्हेंबरला फडणवीसांना नोटीस जारी केली होती. या नोटिसीला 4 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?
माजी मुख्यमंत्री देकेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 1996 आणि 1997 मध्ये मानहानी, फसकणूक आणि खोटय़ा कागदपत्रांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र या दोन्ही आरोपांची निश्चिती झाली नक्हती. या गुन्हय़ांविषयीची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात न लिहिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याची मागणी वकील सतीश उके यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या