सात्त्विकता दर्शविणारे दत्तमंदिर

निसर्गरम्य श्रीक्षेत्र देवगडच्या परिसरात अथक परिश्रमातून वनराई साकारण्यात आली आहे. त्याच भूनंदनवन क्षीक्षेत्र देवगड परिसरातील प्रमुख मंदिर म्हणजे श्री दत्तप्रभूंचे मंदिर… आकर्षक नक्षीकाम, दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर, चार फूट उंचीचा भव्य सुवर्णकळस आणि सात्त्विकतेची प्रचीती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्टय़े… हरिनामाच्या गजराने पावन झालेल्या मंदिराचा कोपरा न् कोपरा या गजरात आपला आवाज मिसळतोय असं वाटतं. श्रीदत्तप्रभूंचे सोज्वळ रूप डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करतच भाविक मंदिराबाहेर येतात.

समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी ज्यांच्या हातात विश्वासाने देवगड सोपवले ते प.पू. भास्करगिरी महाराज हे तर गुरुनिष्ठेचा आदर्शच… देवगड संस्थानात भाविकांच्या सेवेसाठी भक्तनिवासही आहे. येथे एकावेळी १ हजार भाविकांच्या राहण्याची सोय होऊ शकते.

कसे जाल…?

> विमानसेवा : संभाजीनगरहून ५३ कि.मी. किंवा पुण्याहून १८० कि.मी. येथपर्यंत विमानसेवा उपलब्ध.

> रेल्वेसेवा : संभाजीनगर, नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणांपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध.

> बससेवा : संभाजीनगर ते पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून ५ कि.मी.वर श्रीक्षेत्र देवगड आहे.