देवगडमध्ये पावसाचे धुमशान, झाड पडल्यामुळे वाहतुक ठप्प

देवगडमध्ये शनिवारी (8 जून 2024) विक्रमी पाऊस झाला. सरीवर सरी कोसळल्यामुळे रविवारी सकाळी 158 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे देवगड तालुक्यात बऱ्याच भागांमध्ये नुकसान झाले आहे.

देवगडमध्ये कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सामटवाडी येथील दत्ता जोशी यांच्या कंपाउंडमधील विहिरीचा काही भाग कोसळला विहिर कोसळल्यामुळे विहिरी शेजारुण जाणारा रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कावलेवाडी रोडवरील खान यांच्या दुकाना शेजारी असलेले झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे रात्री 11 वाजल्यापासून वाहतुक ठप्प झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नगरसेविका स्वरा कावळे यांनी नगरपंचायतीमध्ये याबाबतची माहिती दिल्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी तात्काळ झाड हटविले व मार्ग वाहतुकीस खुला केला.