पॅडमॅननंतर ‘धडक’चेही प्रदर्शन लांबणीवर

28

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर हे दोन नवीन चेहरे सैराटच्या हिंदी रिमेक ‘धडक’मधून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. मात्र त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. हा चित्रपट ६ जुलै ऐवजी २० जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे निर्माता करण जोहरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहे.

हिंदी सैराटची ‘धडक’

करणने ‘धडक’चे नवीन पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. या नव्या पोस्टरमध्ये ईशान आणि जान्हवी दिसत असून ‘धडक’च्या प्रदर्शनाची तारीखही बदललेली दिसत आहे. अभिनेता अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पॅडमॅन’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आधी २५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी ‘पद्मावत’ हा चित्रपट रिलीज होणार असल्याने ‘पॅडमॅन’ आता ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘पद्मावत’साठी ‘पॅडमन’ बॅकफूटवर

ऐतिहासिक कमाई करणारा मराठी चित्रपट सैराट या चित्रपटाचा ‘धडक’ हा हिंदी रिमेक असणार आहे. त्यात जान्हवी ही आर्चीची तर ईशान हा परशाची भूमिका साकारणार आहे. ‘धडक’ चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन करणार असून शंशाक खैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या