कर्जमाफी देताना सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात!: धनंजय मुंडे

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र सरकारने सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले. मात्र कर्जमाफीचे निकष निश्चित करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

राज्य सरकारने ३० जून २०१६ पूर्वीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या येाजनेचा भाग म्हणून चालु खरीप हंगामासाठी मदत व्हावी याकरिता बँकांनी दहा हजार रुपये शासन हमीच्या बदल्यात द्यावे अशा स्वरुपाचा शासन आदेश काढला आहे. हा आदेश काढण्याआधी राज्यातील इतर प्रमुख राजकीय पक्षांसोबत चर्चा करणे टाळण्यात आले. आदेश काढताना निश्चित केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांवर अप्रत्यक्षपणे अन्याय झाला आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

मागच्या वर्षीचा पिकांच्या कर्जाचा आराखडा सुमारे ५१ हजार कोटींचा होता. त्यापैकी २८ टक्के कर्जाची वसुली झाली आहे. याचा अर्थ ३० जून २०१६ नंतरची सुमारे ७० टक्के कर्ज व शेतकरी थकबाकीदारच आहेत. सततचा दुष्काळ, नापिकी व गेल्या तीन वर्षात सातत्याने कोसळलेले शेतमालाचे बाजारभाव यामुळेच राज्यातला शेतकरी हा थकबाकीदार झालेला आहे. अशा परिस्थितीत ३० जून २०१६ नंतरच्या थकबाकीदारांना वगळून सरकारने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या