फडणवीस सरकारचा खोटारडेपणा उघड!: धनंजय मुंडे

सामना ऑनलाईन । मुंबई

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा करुन वर तीन-चारशे कोटी रुपये खर्चून जाहिराती करायच्या आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची ही शुद्ध फसवणूक आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे. सरकारचा हा खोटेपणा उघड झाला आहे, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

धाराशिव जिल्ह्यातील एक तरुण शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर येऊन आत्महत्येचा विचार करतो. यातूनच सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा पोकळ असल्याचे सिद्ध होते. सरकारने खोटी जाहिरातबाजी करुन शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी तातडीने खरेदी केंद्र सुरू करावी. खरेदीच्या जाचक अटी काढून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या