…तर दानवेंच्या XXवर गोळ्या घाला, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

44

सामना ऑनलाईन । जालना

पोलीस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारू शकले असते, असे असंवेदनशील विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, ‘शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या दानवे यांच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली आहे’, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन राष्ट्रवादीने मोर्चा काढला होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत मुंडे यांनी दानवे आणि सरकारवर हल्ला चढवला.

छातीवर नाही पायावर गोळ्या मारायच्या, दानवेंचा शेतकऱ्यांवर पुन्हा गोळीबार

‘२०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी जी चूक केली तशी पुन्हा करू नका, असे आवाहनही मुंडे यांनी केले. भाजपने दाखवलेल्या ‘अच्छे दिन’ या दिवा स्वप्नाची हौस फिटली आहे. भाजपने वेगवेगळ्या फसव्या योजनांची घोषणा करत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.

मुंडे यांनी सरकारच्या कर्जमाफी योजनेवरही टीकास्त्र सोडले. ‘भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. सरकारने केलेली कर्जमाफीची योजना ही राज्यातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक आहे. सरकारविरोधात आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय उसंत घेणार नाही, असे मुंडे म्हणाले.

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले होते. यातील एकाच्या पायाला, दुसऱ्या शेतकऱ्याच्या छातीला गोळी लागली होती. त्यानंतर जखमी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवे यांनी ऊसदर आंदोलन हाताळण्यात चूक झाल्याची कबुली देताना पोलीस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकले असते. पण, ती गोळी छातीत लागली, हे चुकीचं आहे, असे असंवेदनशील विधान केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या