धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या मारल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी धनगर समाजातील तीन व्यक्तींनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी त्या तिघांना तेथून बाहेर काढले आहे.
View this post on Instagram
धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्याविरोधात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 4ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्या होत्या.