आयएमडीबीच्या रँकिंगमध्ये अभिनेता धनुष टॉपवर; आलिया, ऐश्वर्याने पटकावले अव्वल स्थान

आयएडीबीने 2022 सालच्या सर्वाधिक प्रसिद्ध हिंदुस्थानी कलाकारांची टॉप 10 यादी घोषित केली आहे. यामध्ये अभिनेता धनुष टॉपवर असून अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही अव्वल स्थान पटकावलं आहे. तसेच राम चरण तेजा, समंथा रूथ प्रभू, हृतिक रोशन, कियारा अडवानी, एन. टी. रामाराव ज्युनिअर, अल्लु अर्जुन, यश हे कलाकारही यादीत आहेत.

जगभरातील लोक हिंदुस्थानी सिनेमा, वेबसीरिज आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आयएमडीबीला भेट देत असतात. आयएमडीबीच्या कोटय़वधी व्हिजिटर्सच्या पेज ह्यूजच्या आधारे हे रँकिंग देण्यात आले आहे. या वर्षीच्या यादीत समावेश झाल्याबद्दल आलिया भट्टने आनंद व्यक्त केला आहे. आलिया म्हणाली, 2022 हे माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भात आतापर्यंतचे सर्वांत संस्मरणीय वर्ष ठरले आहे. मी प्रेक्षकांचे सदैव ऋणी राहीन. देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते व कलाकारांसोबत काम करणे, हा माझा गौरव आहे. जोपर्यंत पॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.