धर्मा पाटील आत्महत्येप्रकरणी मानवाधिकार आयोग, लोकायुक्तांकडे तक्रार

20

सामना ऑनलाईन, मुंबई

धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर भाजप आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिह्यातील जमिनीत  १३५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे आत्महत्येच्या चौकशीची मागणी केल्यानंतर आज विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली, तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रावल यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करून त्यांच्या अडचणीत आणखी भरच टाकली आहे.

राज्य मानकाधिकार आयोगाने मानकी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अन्वये पोलीस किभागाला सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश द्यावे तसेच आयोगाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित ‘घटना संशोधन समिती’ नेमावी, धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पाच कोटींची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी आयोगाकडे केली आहे.

धुळे, नंदुरबार जिह्यातील गैरव्यवहाराची चौकशी करा!

जयकुमार रावल यांच्या धुळे आणि नंदुरबार जिह्यात बेकायदेशीर जमीन गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. गैरव्यवहारासंबंधित कागदपत्रे घेऊन ते लोकायुक्त कार्यालयात पोहोचले. लोकायुक्त न्यायमूर्ती म. ल. टहलियानी यांच्या कार्यालयात स्वतः जाऊन त्यांनी ही रीतसर तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या