काव्यरसग्रहण – धीर तू सोडू नको

>>गुरुनाथ तेंडुलकर

माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा… त्यातील प्राथमिक गरज म्हणजे अन्न… आणि कोणत्याही अन्नाचं पृथक्करण केलं तर आपल्याला आढळेल की, त्यातल सर्वच्या सर्व घटक हे केवळ नैसर्गिकच असतात. पाव, बिस्किटं जरी कारखान्यात तयार होत असल तरी त्यातील प्राथमिक घटक म्हणजे आटा किंवा मैदा आणि साखर… त्यांचं पुन्हा पृथक्करण केलं तर आटा किंवा मैदा हा गव्हापासून आणि साखर उसापासून बनवलेल असते. हे प्राथमिक अन्न घटक कोणत्याही कारखान्यात तयार होत नाहीत. ते तयार होतात काळय़ा मातीत आणि ते तयार करणारा कामगार असतो आपला शेतकरी बंधू.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, आज देशातील सर्वात दुःखी आणि दरिद्री माणूस शेतकरीच आहे. कारखान्यातील काम करणाऱ्या माणसाला कामाचे तास नेमून दिलेले असतात. अमुक एक उत्पादन काढलं की, त्याला मिळणारं वेतन हे निश्चित असतं. कचेरीत काम करणाऱ्या शिपायापासून ते वरिष्ठ” अधिकाऱ्यांपर्यंत सगळय़ांच्या जबाबदाऱ्या, कामाचे तास आणि मिळणारं वेतन यांच सुनिश्चित सांगड घातलेली असते, पण शेतकऱ्यांच्या बाबतत मात्र सगळीच अनिश्चितता.

कृषीप्रधान हिंदुस्थानात आजही शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे ही दुर्दैवाच गोष्ट. काळय़ा आईचा थोरला मुलगा असणारा हा शेतकरी आज सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेला दिसतो.

बी-बियाण्यांसाठी, खतांसाठी सरकारी कचेरीत चकरा मारणारा, अधिकाऱ्यांची मनमानी सहन करून खतासाठी, सबसिडीसाठी लाचार होणारा, देशवासीयांचा पोशिंदा असूनही स्वतः उपाशी, अर्धपोटी राहणारा, प्रसंग घरदार गहाण टाकणारा, कोरडय़ा निरभ्र आकाशाकडे डोळे लावून बसणारा, दुष्काळात दारातील जनावरं खाटकाकडे विकणारा आणि त्याच जनावरांच्या गळय़ातील दोरी स्वतःच्या गळय़ात अडकवून आत्महत्या करणारा…

स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये अनेक सरकारं आली आणि गेली, पण शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न मात्र कुणीच सोडवले नाहीत. त्याला बळीराजा म्हणून संबोधलं तरी तो खऱ्या अर्थानं राजा कधीच झाला नाही, तो रंकच राहिला. दिवसेंदिवस खंकच होत गेला.

शेतकऱ्यांची ही व्यथा आजच्या कवितेतून मांडली आहे कवयित्री वृंदा भांबुरे यांनी. मराठी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणाऱ्या वृंदाताई त्यांच्या ‘का करिस बलिदान’ या कवितेच्या शब्दाशब्दांतून शेतकऱ्यांना दिलासा देतात. त्या म्हणतात…

का करिस बलिदान कृषिवला

का करिस बलिदान

मिळेल सारे पुन्हा परंतु

कधी न मिळतो प्राण…

2015 सालच्या ‘हेमांगी’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही कविता वाचताना आजही शेतकऱ्यांच्या स्थितीत फारसा बदल झालेला नाही हे ध्यानात येतं. महाराष्ट्रात आजही ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचायला मिळतात ही आपल्याला शरमेची गोष्ट आहे. आपण या बातम्या वाचतो, क्षणभर हळहळतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो, पण वृंदाताई मात्र शेतकरी बांधवांना आश्वासन देतात.

या कवितेवर विचार करताना मला स्वतःला आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे केवळ शेतकरीच नव्हे, तर अभ्यासात मागे पडणारा-नापास झालेला विद्यार्थी, धंद्यात नुकसान झालेला व्यापारी, सासरच्या जाचाला कंटाळलेली नवविवाहित तरुण, नोकरकपातीमुळे अचानक नोकरी जाऊन बेकार झालेला कामगार-कर्मचारी, आजारपणाला कंटाळलेला रुग्ण, प्रतिकूल परिस्थितमुळे गांजलेला मध्यमवर्गीय… अशा अनेक निराश, हताश जिवांना दिलासा देणारी ही कविता आहे. कोणत्याही परिस्थितला, कोणत्याही समस्येला आत्महत्या हे उत्तर असूच शकत नाही. आयुष्याला पूर्णविराम देण्यापेक्षा एखादा स्वल्पविराम देऊन थोडासा संयमानं विचार केला तर दिवस नक्की पालटतील. ऊर्जेनं भरलेली-भारलेली ही उत्कृष्ट कविता लिहिल्याबद्दल वृंदाताईंचं मनापासून कौतुक!

पोशिंदा तू या जगताचा

व्यर्थ दवडीस जव मोलाचा

वरवंटा जरी दुष्काळाचा

सरतील हेही भोग कधीतरी

बदलणार दिनमान… का करिस…

कर्ज वाढले डोईवरत

फिटेल कैसे ही तुज भांती

राजकारण विचार करित

बीबियाणे, व्याजमाफीचे

मिळेल का वरदान… का करिस…

झुगारून दे फास गळ्याचा

विचार करी रे प्रियजनांचा